Crime News : पुण्यात ८ बांगलादेशींना अटक, एटीएसची कारवाई, धक्कादायक माहिती आली समोर…

(Crime News) पुणे : महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी (एटीएस) पथकाने ने पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. एटीएस ने नारायणगाव परिसरात कारवाई करत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ८ बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतात घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. बांगलादेशी नागरिक नारायणगाव परिसरात मजूरी करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
नारायणगावर परिसरात बांगलादेशी नागरिकांनी बेकायदा वास्तव्य केले होते. याबाबतची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली. त्यानंतर एटीएसच्या पथकाने गुरुवारी आठ बांगलादेशी नागरिकांना नारायणगाव परिसरातून ताब्यात घेतले. आठवड्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि एटीएसने पुणे, ठाणे परिसरात कारवाई करुन आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करणाऱ्या १५ जणांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणात कोंढव्यातील दोघांची चौकशी करण्यात आली होती.

यापूर्वी बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांनी बेकायदा वास्तव्य केल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. पुणे पोलिसांना बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत कारवाई करुन बांगलादेशी महिलांसह साथीदारांना ताब्यात घेतले होते.