लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड, चोराला चोर म्हणणे देशात गुन्हा ठरला : उद्धव ठाकरे


मुंबई : मोदी आडनाव मानहानी प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यानंतर याचे पडसाद राजकीय क्षेत्रात उमटताना दिसत आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया देत भाजपचा समाचार घेतला आहे.

 

 

 

यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

 

 

 

दरम्यान, सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!