शेतकऱ्याला ऊसतोड मुकदमाने घातला ‘एवढ्या’ लाखाला गंडा; दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा..


दौंड : दौंड तालुक्यातील नंदादेवी येथील शेतकरी आणि ऊस वाहतूक करणारे ठेकेदार यास ऊस तोडीसाठी मजूर पुरवठा करतो असे सांगून तब्बल ७ लाख ५० हजार रुपये घेऊन ऊसतोड मजुर पुरवठा न करता आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील ऊसतोड मुकदमावर दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

भरत गणपत जाधव ( वय ३०, अंचाळे तांडा, ता.जि धुळे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ऊसतोड मुकदमाचे नाव आहे. लालासाहेब आटोळे यांनीयाप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मिळालेल्या माहिती नुसार, दादेवी येथील शेतकरी लालासो आटोळे हे मागील आठ वर्षापासून परिसरातील साखर कारखान्यात ऊस वाहतूकीचे काम घेत आहेत. त्यांनी सन २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्यांमध्ये ऊस वाहतूकदारीचे काम घेतले होते.

त्यासाठी त्यांनी ऊसतोड मजूर पुरवठा करणाऱ्या मुकदम भरत गणपत जाधव याच्याशी ऊसतोड मजूर पुरवठा करण्यासाठी १ जुलै २०२१ रोजी करार केला होता.

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना या ठिकाणी २४ मजूर, ८ बैलगाडी पुरविण्याचे ठरवले. त्यापोटी करारनामा झाल्यानंतर काही दिवसांनी रोख रक्कम २० हजार रूपये उचल म्हणून दिले.

जोडीला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व सेंट्रल बँकेच्या खात्यातून ७ लाख ४० रूपये ऑनलाइन पाठविले होते. मात्र ऊसतोड मजूर पुरवठा करण्यासाठी वारंवार फोन केले असता, जाधव याने फोन उचलला नाही.

त्याच्या गावी याबाबत चौकशी केली असता तो तिथून फरार झाला होता. मुकदम भरत जाधव याने पैसे घेऊनही ऊसतोड मजूर पुरवठा केला नाही.

त्यामुळे लालासाहेब आटोळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेत मुकदम भरत जाधव याने आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दिले. त्यानुसार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!