मोठी बातमी! मुलीच्या छेडछाड प्रकरणी क्रिकेटर पृथ्वी शॉ अडकला, मुंबई हायकोर्टाने केली शिक्षा….

मुंबई : भारतीय टीमचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या अडचणीत आला आहे. त्याच्याबाबत एका प्रकरणामुळे सध्या खळबळ उडाली आहे. मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने त्याला दंड ठोठावला आहे. मुंबईतील अंधेरी परिसरातील एका पबमध्ये पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात वाद झाला होता.

सपनाचा आरोप आहे की त्याच्या मित्राने शॉला सेल्फी घेण्यास सांगितले होते, याला शॉने नकार दिला आणि फोन हिसकावून फेकून दिला. यानंतर, जेव्हा सपना गिलने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शॉ आणि त्याच्या मित्रांनी तिला मारहाण केली आणि विनयभंगाचे गंभीर आरोपही केले. तसेच नको ते कृत्य केले.
याबाबत तिने पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला. असे असताना मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. यानंतर तिने अंधेरी येथील मॅजिस्ट्रेट कोर्टात याचिका दाखल केली. याबाबत सुनावणी सुरू आहे. याचिकेवर उत्तर न दिल्याबद्दल पृथ्वी शॉवर कारवाई करण्यात आली. न्यायालयाने यापूर्वी शॉला उत्तर दाखल करण्याची शेवटची संधी दिली होती, परंतु त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

मॅजिस्ट्रेट कोर्टाने मान्य केले की एफआयआर दाखल करण्यास विलंब झाला होता, परंतु आरोप गंभीर आहेत, म्हणून प्रकरणाची चौकशी आवश्यक आहे. कोर्टाने सांताक्रूझ पोलिसांना सीआरपीसीच्या कलम २०२ अंतर्गत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यामुळे याबाबत चौकशी सुरू आहे.
दरम्यान, आता सत्र न्यायालयाने पृथ्वी शॉविरुद्धच्या याचिकेवर उत्तर दाखल न करणे हलके घेतले नाही आणि दंड ठोठावला आहे. खटल्याच्या पुढील सुनावणीत पोलिस तपास अहवाल महत्त्वाचा ठरेल, यामुळे सध्या त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.