Cricket in Olympic : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ऑल्मिपिकमध्ये १२८ वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश, टी-20 सामनेही होणार…
Cricket in Olympic : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने क्रिकेट या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसह पाच नवीन खेळांचा समावेश करण्यावर शिक्कामोर्तब करण्या मुंबईत आज (ता. १६) आयओसीची १४१ वी सत्र बैठक पार पडली. Cricket in Olympic
या बैठकीनंतर आयओसीने क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील समावेशाची घोषणा केली आहे. त्यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजलिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे टी- 20 सामने खेळवले जातील.
आयओसीच्या या निर्णयामुळे तब्बल १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. ऑलिम्पिक समितीने सांगितले की क्रिकेट, सॉफ्टबॉल, स्क्वॉश, लॅक्रॉस आणि फ्लॅग फुटबॉल या पाच खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट स्पर्धा टी-२० फॉरमटमध्ये असेल. पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेचा त्यात समावेश असणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) कार्यकारी मंडळाने गेल्या आठवड्यात लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. पुरुष आणि महिला संघांमध्ये टी-२० स्वरूपात क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे.
ऑलिम्पिक समितीने सांगितले की क्रिकेट, सॉफ्टबॉल, स्क्वॉश, लॅक्रॉस आणि फ्लॅग फुटबॉल या पाच खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. बेसबॉल या स्थानिक खेळाचा ऑलिम्पिकच्या माध्यमातून प्रसार व्हावा, अशी संयोजक देशाची म्हणजेच अमेरिकेची विनंती ऑलिम्पिक समितीने मान्य केली आहे.
स्क्वॉश हा तसा जागतिक खेळ आणि त्याच्या समावेशाविषयी अनेक वर्षे हालचाली सुरू होत्या. पण या सर्व खेळांमध्ये दर्शकव्याप्तीच्या बाबतीत क्रिकेट नि:संशय मोठा आहे. आयसीसीसह क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांच्या प्रयत्नांनंतर आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला आहे.