प्रेमात वेडा, लाखोंचा मोबाईल भेट, बंगला, जमीन नावावर करण्याचा हट्ट अन् लॉजवर…!! गोविंद बर्गे प्रकरणात वेगळीच माहिती समोर


बीड : येथील गेवराई तालुक्याचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. बर्गे यांनी आपल्या कारमध्ये बसून स्वतःवर गोळी झाडली होती. ही घटना बार्शीतील नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोर घडली.

याबाबत पूजाने संपर्क तोडल्याने नैराश्येत जाऊन त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा सध्या सुरू आहे. नंतर मात्र पूजाने कबुली दिली आहे की ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. बर्गे हे पूजाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले होते. अनेकदा ते लॉजवर भेटत असल्याचे देखील समोर आले आहे.

कला केंद्रातील भेटींव्यतिरिक्त ते विविध ठिकाणी एकत्र फिरत आणि लॉजवर राहत असत. बीडसह वैरागमधील काही लॉजवर ते दोघे सोबत राहिले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यांच्यात संबंध असल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे तपासला वेगळं वळण लागलं आहे.

बर्गे कधी तिच्या घरात कोणी नसताना किंवा वेगळ्या फ्लॅटवरही भेटत असत. यामुळे दोघेही प्रेमात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तसेच त्याने मोठ्या प्रमाणावर तिला पैसे दिल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे आता पोलीस याबाबत तपास करत आहेत.

दरम्यान, गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. कला केंद्रात जाऊन दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. नंतर गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. नंतर त्यांचे प्रेमात रूपांतर झाले.

अनेकदा लॉजवर भेटत पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. तसेच बंगला, जमीन नावावर करण्यासाठी हट्ट केला तसेच बलात्कार केल्याची धमकी देखील दिली. यामुळे त्यांच्यात वाद हा वाढतच गेला. यातून ही घटना घडली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!