Covid JN.1 Cases : काळजी घ्या, पुण्यात एकाच दिवशी सापडले कोरोनाचे ५९ रुग्ण, नव्या व्हेरिएंटचा प्रसार वाढला..


Covid JN.1 Cases  पुणे : नवीन वर्ष सुरू होताच कोरोनाच्या जेएन.१ व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. संपूर्ण राज्यात या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा मास्क लावावे लागणार का? त्याचबरोबर लॉकडाऊन देखील पुन्हा होणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाची कालची म्हणजेच सोमवारची आकडेवारी देखील चिंता वाढवणारी आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी पुण्यात जेएन.१ चे तब्बल ५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर राज्यातील एकूण रुग्णसंख्या २५० इतकी झाली आहे.

चिंताजनक बाब म्हणजे, राज्यात आढळून आलेल्या २५० रुग्णांमधील १५० रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यातील आहे. पुण्यात जेएन.१ व्हेरिएंटचा वाढता प्रसार पाहता, नागरिकांनी काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असा सल्ला देण्यात आला आहे. Covid JN.1 Cases

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण जाणून घ्या..

नागपूर ३०, मुंबई २२, सोलापूर ९, सांगली ७, ठाणे ७, जळगाव ४, अहमदनगर ३, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, कोल्हापूर २, नांदेड २, नाशिक २, धाराशिव २, अकोला १, रत्नागिरी १, सातारा १, सिंधुदुर्ग १ आणि यवतमाळ १ अशी रुग्णसंख्या आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!