स्वारगेट एसटी बलात्कार प्रकरणी दत्ता गाडेला कोर्टाचा मोठा झटका! घेतला मोठा निर्णय…


पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेला कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. आरोपीने पीडितेच्या संमतीशिवाय लैंगिक अत्याचार केला आहे. मात्र न्यायालयाने युक्तिवाद मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहेत.

पीडित तरुणीशी सहमतीने संबंध होते, असा आरोपीचा दावा देखील स्पष्टपणे फेटाळण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं असून, आरोपीच्या अडचणीत भर पडली आहे. यामुळे आरोपीला लवकरात लवकर शिक्षेची मागणी कऱण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपी गाडे याने अ‍ॅड. वाजेद खान बीडकर यांच्या माध्यमातून जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

त्यांनी दावा केला की, दोघांमध्ये सहमतीने संबंध झाले. मात्र, विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि पीडितेच्या वकील अ‍ॅड. श्रीया आवले यांनी या युक्तिवादाला तीव्र विरोध केला. सरकारी वकिलांनी असा मुद्दा मांडला की, आरोपी जामिनावर सुटल्यास पीडितेच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.

तसेच आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असून त्याच्यावर जबरी चोरीसह सात गुन्हे आधीच दाखल आहेत. सरकारी पक्षाने स्पष्ट सांगितले की, त्याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते. हे प्रकरण तापले होते.

दरम्यान, पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव वाढला होता. या प्रकरणी आरोपीच्या वकिलांवर देखील मोठ्या प्रमाणावर टीका केली गेली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!