मेट्रोमध्ये कपल करत होते किस, प्रवाशांनी थेट DCP ला टॅग करत व्हिडिओ केला व्हायरल..
नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो मधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगा व मुलगी मेट्रोमध्ये खाली बसून लिपलॉक किस करत आहेत. खूपवेळ त्यांचा हा रोमान्स सुरूच होता.
या व्हिडीओमध्ये एक मुलगा मेट्रोमध्ये खाली बसला आहे. त्याच्या मांडीवर त्याची गर्लफ्रेंड आहे. याठिकाणी दोघेही एकमेकांना किस करताना पहायला मिळत आहेत. आजूबाजूला लोकं देखील आहेत.
समोरील सीट वर बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओ वरून दिल्ली मेट्रोवर लोकांनी ताशेरे ओढले आहेत. डीसीपी दिल्ली मेट्रोला टॅग करत एका यूजरने ट्विटरवर लिहिले, तुम्ही जागे आहात का? असे म्हंटले आहे.
तसेच दिल्ली मेट्रोमध्ये सतत अशी प्रकरणे घडत आहेत. मेट्रोमधील महिलांच्या सुरक्षिततेसाठी अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करायला हवी. असे मत दिल्ली महिला आयोगाने यावेळी मांडले आहे.
दिल्ली मेट्रोने काही दिवसांपूर्वीच या पार्श्वभूमीवर प्रवाशांना आवाहन देखील करण्यात आले होते. मात्र अशा घटना वाढतच आहेत. यामुळे यावर आळा बसने आवश्यक आहे.