छत्रपतीच्या मतमोजणीला सुरुवात, कोण मारणार बाजी? काही वेळातच कल येणार हाती…

भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. नऊ वाजल्यापासून मतपत्रिकेची जुळवाजुळव करत असताना अकरा वाजता सुरुवातीचे कल हाती येणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे छत्रपतीच्या सभासदांचे याकडे लक्ष लागले आहे.

या संदर्भात छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक निर्णय अधिकारी व बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी माहिती दिली. याबाबत माहिती अशी की, ब प्रवर्गातील उमेदवाराचा पहिला निकाल जाहीर होईल. हा निकाल झाल्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची मतमोजणी होईल.


काल छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शांततेत मतदान झाले. आता बारामतीच्या प्रशासकीय भवनातील यांत्रिकी भवन, जलसंपदा व लघु पाटबंधारे खात्याच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर ही मतमोजणी होणार आहे. यावेळी मोठी यंत्रणा याठिकाणी उभी केली आहे.
त्यासाठी 38 टेबल ची रचना करण्यात आली आहे. दोन फेरीमध्ये ही मतमोजणी पूर्ण होईल. काल उन्हाची तिरीप असताना देखील मतदार घराबाहेर पडले. दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी ही 50% च्या आत होती, मात्र दुपारनंतर मतदार मतदानासाठी आले. यामुळे मतदान वाढले.
एका मतदाराला दहा मतपत्रिका असूनही मतदान वेगात पूर्ण झाले. यावेळी अनेकांची नावे गायब झाली तसेच अनेकांची नावे वेगळ्या मतदान केंद्रावर आल्याने काहीसा गोंधळ सभासदांचा झाला. आता आज याबाबत अधिकृत निकाल काही वेळातच हाती येणार आहे.
