Corona Vaccine Certificate : कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरून नरेंद्र मोदी यांचा फोटो काढला! कारणही आले समोर…


Corona Vaccine Certificate : कोरोना विषाणू प्रतिबंधक लस कोविशिल्डचे काही दुष्परिणाम असल्याचे समोर आले आहे. कोविशील्ड लसीच्या दुर्मिळ दुष्प्रभावांच्या वादाच्या दरम्यान, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कोविड -१९ प्रमाणपत्रांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो गायब झाल्याचे निदर्शनास आणले.

देशात मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण झाले आहे. या सगळ्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जाते. भाजप नेत्यांनी याचा जोरदार प्रचार केला होता. मात्र, कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने यूकेच्या कोर्टामध्ये दुष्परिणामांबाबत कबुली दिली आहे. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हे मोठे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे.

कोविशिल्ड लस घेतल्याने थ्रोम्बोसिससोबत थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) होतो असे कंपनीने कबूल केले आहे. अनेक भारतीय लोकांनी आपले कोरोना सर्टिफिकेट तपासले असता त्यांना पंतप्रधान मोदी यांचा फोटा दिसला नाही. याठिकाणी क्यूआर कोड दिसत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने हा फोटो हटवला असल्याचे स्पष्ट आहे. Corona Vaccine Certificate

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवण्यात आल्याने सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, सध्या लोकसभा निवडणुका सुरू असल्याने आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो सर्टिफिकेटवरून हटवण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!