कोरोना आता पुणे जिल्ह्यातही पसरतोय, दौंडमध्ये कोरोनाने डोकं वर काढलं, तिघांवर उपचार सुरू..

दौंड : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर संख्या वाढत आहे. मुंबईत संख्या वाढत असताना आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील आता कोरोना पसरू लागला आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यात तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
यात दोन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. या तीन बाधित रुग्णांपैकी दोन रुग्ण हे मूळचे दौंड तालुक्यातील आहेत तर एक महिला रुग्ण हा श्रीगोंदा तालुक्यातील असून तो दौंड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. यामुळे शहरात भीती वाढली आहे. सध्या देशातच रुग्ण वाढले आहेत. यामध्ये केरळ आणि महाराष्ट्राचा आकडा जास्त आहे.
दौंड तालुक्यातील दोन पुरुष रुग्णांपैकी एका रुग्णावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसरा कोरोना बाधित रुग्ण हा घरीच होम कॉरंटाइन असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे सर्दी ताप खोकला यासारखी प्राथमिक लक्षणे जाणवल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.
दौंड शहर आणि ग्रामीण भागात इतर काही कोरोनाचे रुग्ण आहेत का ? याची माहिती देखील प्रशासन घेत आहे. तर ज्या रुग्णांना कोरोना व्हायरस संदर्भात लक्षणे दिसून येतील त्यांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क करावा, असेही सांगण्यात आले आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे.
आपल्या आरोग्याची तपासणी करावी कोणताही आजार अंगावर काढू नये असं आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान, सध्या देशातच रुग्ण वाढले आहेत. यामध्ये केरळ आणि महाराष्ट्राचा आकडा जास्त आहे. यामुळे येणाऱ्या काळात प्रशासनापुढे मोठं आव्हान असणार आहे. आपणही याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.