Corona Cases Maharastra : मोठी बातमी! महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, पुन्हा लॉकडाऊन होणार?
Corona Cases Maharastra : वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. अहमदनगरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडवणारी ही अपडेट आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अहमदनगरमधील दोन विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. तीन दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. यामध्ये त्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. Corona Cases Maharastra
तसेच नाशिक शहरांमध्ये देखील कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे तीन रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे. त्या रुग्णांवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून दोन जण घरीच क्वारंटाईन आहेत.
दरम्यान, देशासह राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा थैमान घातले आहे यामुळे आता आरोग्य विभाग सतर्क झाला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले
जात आहे.