आता AC नसला तरीही थंड राहील कार! मारुती सुझुकीने करून दाखवल…!

मुंबई : अनेकजण कार चालवत असताना कारच्या एसीचा वापर करत असतात. परंतु एसी चालू असल्याने त्याचा परिणाम कारच्या मायलेजवर दिसून येतो. त्यामुळे वापरकर्त्यांना आर्थिक फटका बसतो, परंतु तुमची आता ही समस्या दूर होऊ शकते.
आता नवीन मारुती सुझुकी फ्रॉन्क्स लाँच होणार आहे. कंपनी या कारमध्ये एक खास फिचर देत आहे ज्यामुळे तुम्हाला एसी लावण्याची कसलीच गरज पडणार नाही. यामुळे तुमच्या कारचे मायलेज कमी होणार नाही. कंपनीची ही कार सध्या लाँच झाली नाही.
या कारच्या बुकिंगने अनेक रेकॉर्ड मोडून काढले आहेत. आता कंपनीने या कारचे असे खास वैशिष्ट्य आणले आहे, ज्यामुळे या कारच्या बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
या कारच्या बुकिंगने अनेक रेकॉर्ड मोडून काढले आहेत. आता कंपनीने या कारचे असे खास वैशिष्ट्य आणले आहे, ज्यामुळे या कारच्या बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दरम्यान, सूर्यप्रकाशातील हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरण थेट कारमध्ये येत असतात, परंतु जेव्हा कारला यूव्ही कट ग्लास लावण्यात येते तेव्हा हे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांना कारमध्ये प्रवेश करता येत नाहीत.
त्यामुळेच कारमधील तापमान 2-3 अंश सेल्सिअसने कमी होते आणि जर गाडी थंड असल्यास एसी चालू करण्याची गरज पडत नाही. सध्या, भारतात या सेगमेंटमध्ये UV कट ग्लाससह फक्त मारुती फ्रँक्स ऑफर करण्यात येते.