वाद पेटणार!भाजपकडून बदलापूरच्या अत्याचार प्रकरणातील सहआरोपीची’ स्वीकृत नगरसेवकपदी’ नियुक्ती


मुंबई :राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराला जोर आला असताना भाजपने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका सहआरोपीलाच स्वीकृत नगरसेवक पद दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.तुषार आपटे यांची भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली आहे

काय आहे प्रकरण?

बदलापूरमधील एका नामवंत शाळेत ऑगस्ट 2024 मध्ये सफाई कर्मचाऱ्याने 4 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. वैद्यकीय अहवालात एका मुलीच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचं समोर आल्यानंतर पीडित मुलीचे कुटुंबीय अहवाल घेऊन शाळेत गेले, मात्र शाळेने सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी 11 तासानंतर शाळेचा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या एनकाऊन्टरमध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर बदलापूर शहरात मोठं जन आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर शाळेच्या विश्वस्तांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तुषार आपटे या शाळेचे सचिव आहेत. त्यांनाच आता आरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवकपद दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

भाजपच्या या निर्णयामुळे विरोधकांनी विशेषता: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपवर टीकेची झोड उठवत गुन्हेगारी प्रवृत्तीला पोसणे हाच भाजपचा खरा अजेंडा असल्याचे म्हटल आहे.भाजपच्या निर्णयाचा नागरिक आणि विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!