मुंबईतील कबूतरखान्यावरून वाद चिघळला ; मराठी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड..


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दादरमधील कबुतरखान्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. कबूतरखाना बंदीच्या विरोधात आज मराठी एकीकरण समितीने जोरदार आंदोलन केले आहे. मात्र पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.समितीने कोर्टाच्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक कारण देत दादर कबूतरखाना बंद केला होता.त्यांच्या या निर्णयाला जैन समाजाकडून विरोध करण्यात आला होता.जैन समुदायाने, पक्षी प्रेमींनी आंदोलन करत कबुतरखान्यावरील शेड, ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आली. दरम्यान आज मराठी एकीकरण समितीकडून या ठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याने दादर परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनादरम्यान कबुतराखाना परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनादरम्यान कबुतरखान्याचा प्रश्न हा धार्मिक नाही, समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे असे आंदोलकांनी म्हटले. शस्त्र उचलण्याची भाषा मराठी माणसाला कोणी सांगू नये असेही यावेळी आंदोलकांनी म्हटले. मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाला अटकाव का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. दरम्यान आज झालेल्या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!