रायगडावरील शिल्पावरून वाद पेटणार! वाघ्या’च्या पुराव्याचा दावा, नेमकं खरं काय?

रायगड : गेल्या काही दिवसांपासून रायगड प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आणि छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी एक मागणी करत आहेत. त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे. यामुळे आता वाद चिघळण्याची शक्यता आहे.
असे असताना आता वाघ्या श्वानाबाबत ऐतिहासिक पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी म्हटले की, रायगड हा पुरातत्व खात्याचा ताब्यात आहे. त्यांच्या आदेशाशिवाय या ठिकाणचा दगड देखील हलवता येत नाही. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
ते म्हणाले, मुळात मुख्यमंत्र्यांना याचा अधिकार आहे का हे पाहावं असा टोलाही त्यांनी लगावला. संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पत्रात वाघ्या श्वानाचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा केला होता. मात्र, त्याचे इतिहासात पुरावे असल्याचे सोनवणी यांनी सांगितले. यामुळे वाद पेटला आहे.
दरम्यान, वाघ्या हा स्वामीनिष्ठ होता, ईमानदार होता. इंग्रजांनी रायगड किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळेस अनेक वास्तू नष्ट झाल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. वाघ्याचा आताच पुतळा जो आहे त्याला होळकर यांनी निधी दिला होता. यामुळे त्यांचे पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आता सोनवणी यांच्या दाव्यामुळे वाघ्याचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते कोणते मुद्दे मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ते काय बोलणार हे लवकरच समजेल.