‘ लाडकी’ वरून वाद पेटला!योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव द्या, मिटकरींची मागणी..


पुणे : महाराष्ट्र राजकारणात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कमालीची चर्चेत आली आहे. या योजनेवरून आता महायुतीत नवा वाद पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या योजनेचे नाव बदलून त्याला ‘ दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार लाडकी बहीण योजना’ असे नाव देण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्याकडे केली आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी असे म्हटले आहे की, लाडकी बहीण योजना केवळ एक सरकारी योजना नसून ती अजित पवारांच्या दूरदृष्टीचा आणि कष्टाचा परिपाक आहे.जून 2024 मध्ये ही योजना सुरू केली तेव्हा अर्थखात्याची धुरा सांभाळणाऱ्या दादांनीच तिजोरीचा ताण असतानाही या योजनेसाठी निधीची तरतूद केली होती. लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये पोहोचतील याची त्यांनी काळजी घेतली . त्यामुळे त्यांचे नाव योजनेला द्यावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना मिटकरी यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. मात्र आता या योजनेच्या नामांतरावरून नवा वाद भेटणार आहे.या योजनेच्या माध्यमातून अजित पवारांच्या स्मृती जपल्या जाव्यात आणि हीच त्यांना राज्यभरातील भगिनींकडून मिळणारी खरी आदरांजली ठरेल, असे भावनिक आवाहन मिटकरी यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वस्तुस्थिती समोर आणण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार लाडके बहीण योजनेच्या नामाकरणाबाबत काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!