वादग्रस्त वक्तव्य अन् रम्मीमुळे कृषीमंत्री बदलले आता नवीन कृषीमंत्र्यांनीही केलं अजब वक्तव्य, पुन्हा वाद वाढला…

इंदापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादात सापडले होते. अखेर त्यांचे पद क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले. वादग्रस्त वक्तव्य, सभागृहात रम्मी गेम यामुळे कोकाटे यांना कृषिमंत्रीपद सोडावे लागले. असे असताना नवे कृषिमंत्री भरणे यांनी देखील पहिल्यादा दिवशी अजब वक्तव्य केले आहे.
भरणे म्हणाले, कारखान्याचे संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात, इतकंच नाहीतर एखादं वाकडं काम करून पुन्हा नियमात बसवतो त्याची माणसं नोंद ठेवतात असं वक्तव्यही दत्तात्रय भरणे यांनी जाहीरपणे केले. यामुळे ते पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. भरणे यांच्या वादग्रस्त व्हिडिओ अगोदरही व्हायरल झाल्या आहेत.
आता कृषीमंत्री झाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वादाची शक्यता आहे. विधिमंडळातील सभागृहात रमी खेळतानाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर कोकाटे चांगलेच चर्चेत आले होते. यानंतर त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती. मात्र अजित पवार यांनी वेगळा निर्माण घेतला.
असे असताना मात्र त्याचा राजीनामा न घेता कोकाटेंची कृषीमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांचं खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले. यामुळे भरणेंना लॉटरी लागली. क्रीडा मंत्रीपद दिल्याने ते आधीपासूनच नाराज झाले होते.
दरम्यान, भरणे यांचे विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत देखील वादग्रस्त विडिओ व्हायरल झाले होते. यामुळे येणाऱ्या काळात भरणे या पदाला कसा न्याय देणार? शेतकरी समाधानी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.