उरुळी कांचन येथे मुख्य चौकात कंटेनर व ट्रकचा अपघात; दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाल्याने वाहतुक कोंडीची पाच किलोमीटर पर्यंत रांग ….!


उरुळीकांचन : उरुळी कांचन ( ता.हवेली ) येथील गजबजलेल्या तळवडी चौकात कंटेनर व एका ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघाताने पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक मोठ्या प्रमाणात खोळंबली आहे. बुधवारी (ता. 21) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावर सोलापूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अक्षय कामठे, मनोज मोहोड, अश्वजीत रत्नपारखे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा कंटेनर हा तळवाडी तळवडी चौकातून शिंदवणे रोडकडे वळत होता. यावेळी सोलापूर च्या बाजूने आलेल्या ट्रक ने कंटेनर ला जोरदार धडक दिली. यावेळी दोन्ही वाहने रस्त्यावर पडली.

दरम्यान, यावेळी पुणे- सोलापूर महामार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तसेच अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी वाहतूक चालकांनी मोठी गर्दी केली होती. सदरची माहिती मिळताच घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस पोहोचले. व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!