भाजप निवडून आला तर संविधानाचा कसा शेवट होईल, कोणी मांडल हे भाकित! कसा होईल लोकशाहीवर हल्ला..!!
Lok Sabha Elections : भाजपने या निवडणुकीत प्रचंड अस्त्र सामग्री या निवडणुकीसाठी जमा केली असून निवडणूक रोख्यापासून ते विरोधी राज्य सरकारांना नामोहरम करण्यापर्यंत वेगवेगळी अस्त्रे वापरली जात आहेत आणि आता निवडणुकीसाठी पक्षांतराचे मोठे अस्त्र वापरून भाजप या निवडणुकीत उतरले आहे.
जर भाजपच्या रणनीतीप्रमाणे भाजपचे उमेदवार निवडून आले, तर ही संविधानावरचा शेवटचा हल्ला करण्याची भाजपची रणनीती असेल असे भाकित देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते पी चिदंबरम यांनी केले आहे.
पी चिदंबरम यांनी एका वृत्तपत्रांत लिहिलेल्या स्तंभ लेखनामध्ये हा मुद्दा मांडला असून, त्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे संकेत दिले आहेत. यातील महत्त्वाच्या मुद्द्यानुसार चिदंबरम यांनी लिहिले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप त्यांच्या अजेंडयानुसार चालतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना वाटते की, त्यांनी बरीच वाट बघितली आहे. आणि आताच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर त्यांचा अजेंडा पूर्ण करण्यात यावा.
या अजेंडयामध्ये एक राष्ट्र एक निवडणूक, समान नागरी संहिता, नागरिकत्व सुधारणा कायदा, भूसंपादन कायद्यातील सुधारणा, शेतीविषयक कायदे आणि पूजास्थळे कायदा रद्द करणे यांचा समावेश आहे. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात आणखी काही गोष्टी उघड होऊ शकतात. पण एकंदरीत संविधानावरचा हा शेवटचा हल्ला असेल.