सततचा त्रास; तरुणी कंटाळली, उंदीर मारण्याची वडी खाल्ली अन्… घटनेने पुणे हादरले

पुणे : एका २० वर्षीय तरुणीला सातत्याने त्रास देणाऱ्या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाने पीडितेचा पाठलाग करत तिला जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या या सततच्या छळाला कंटाळून तरुणीने राहत्या घरी उंदीर मारण्याची वडी खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली आहे. कोंढवा परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात राहणारी २० वर्षीय पीडित तरुणी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. कारण एक तरुण तिचा सतत पाठलाग करत होता आणि जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकत होता.

आरोपी तरुण तिच्या घराजवळ, रस्त्यावर आणि कामाच्या ठिकाणी पाठलाग करत होता. त्याने तिला धमकी दिली की, माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला रस्त्यावरून उचलून नेईन. इतकेच नव्हे, तर त्याने तुझे फोटो एडिट करून व्हायरल करेल अशी धमकी देखील दिली.
या सततच्या छळाला कंटाळून तरुणीने राहत्या घरी उंदीर मारण्याची वडी खाल्ली. तरुणीच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने तिला वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने तिचे प्राण वाचले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तिच्या तक्रारीच्या आधारे आरोपी तरुणाविरुद्ध छेडछाड, धमकी आणि आत्महत्येस