सहमतीने संबंध, पैशांवरून वाद? स्वारगेट अत्याचार प्रकरणात वेगळीच माहिती आली समोर, नेमकं घडलं काय?

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ माजली. याप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत त्याला अटक केली आहे. याबाबत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. आमचे सहमतीने संबंध, मी अत्याचार केला नाही. असा गौप्यस्फोट त्याने केला आहे.
याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून हा प्रकार घडल्याचा दावा रुपाली पाटील यांनी केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमधून याविषयी सांगितलं आहे.
या पोस्ट मध्ये त्या म्हणाल्या, पुणे – शिवाजीकोर्टात बस स्टँड मधील आरोपीला आणायच्या वेळी dcp गिल साहेब यांनी माझीच चौकशी केली. मॅडम तुम्ही आंदोलन करणार असेल,आरोपीला काळे फसणार करणार असेल तर प्लीज करू नका.
त्याचवेळी साहेबांना सांगितले घटनेची खरी माहिती घेऊन त्याची प्राथमिक माहिती खरी असल्याची खात्री केल्याशिवाय मी बोलतही नाही.
कोणतेच आंदोलन मी करणार नाही. तुम्हाला विश्वास नसेलतर तुमच्या सोबत थांबते. मला कोर्टात रिमांड रिपोर्ट पहायचा आहे. केसची माहिती घेणे केसचा स्टडी करणे गरजेचे आहे. पण बस स्टँड घटनेत, पुणे नाहकच बदनाम झाले, ऐका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून याचे प्रचंड खेद वाटतो. दुसरे, बस स्टँड आगराची व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार बाहेर आला.
आता त्यांना सुट्टी नाही. नोकरीवर काम चोख करा नाहीतर घरी बसा कायमचे. तूर्तास एवढेच……, अशी फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात चौकशीत काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मात्र चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.