हगवणेला मदत करणारा काँग्रेस आमदार पुत्र अखेर अटकेत, मदत करणं आलं अंगलट, नेमकं काय केलं?


पुणे : राज्याला हादरवून सोडलेले हुंडाबळी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस तपासात बावधन येथून एका आमदाराच्या मुलाला अटक केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आता या आमदाराच्या मुलाचे या प्रकरणाशी काय कनेक्शन आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. वैष्णवीचे सासरे आरोपी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे जवळपास आठ दिवस फरार होते. त्यांनी या आठ दिवसात अनेक ठिकाणं बदलली तसेच गाड्याही बदलल्या. या दोन्ही आरोपींनी आश्रय दिलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

त्यांच्याकडे देखील चौकशी सुरू आहे. यामधील एक आरोप काँग्रेस आमदाराचा लेक आहे. त्याने राजेंद्र आणि सुशील या दोन्ही आरोपींना लपण्यासाठी मदत केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये काँग्रेसचे आमदर वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे. यामुळे प्रकरण अजूनच गाजले आहे.

ते गेल्या कार्यकाळापर्यंत काँग्रसचे आमदार होते. 28 वर्षे काँग्रेसचे आमदार राहिलेले वीरकुमार पाटील हे ऊर्जामंत्री देखील होते. यामुळे प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार असताना त्यांना मदत करणाऱ्या पाच आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

त्यामध्ये कर्नाटक राज्याचे काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम याचाही आहे. यामध्ये प्रीतम वीरकुमार पाटील कोगनोली, (तहसील चिकोडी) बेळगाम, कर्नाटक. राहुल दशरथ जाधव पुसेगाव, खटाव, सातारा. अमोल विजय जाधव पुसेगाव, खटाव, सातारा. बंडू लक्ष्मण फटक लोणावळा. मोहन उर्फ ​​बंडू उत्तम भेगडे, वडगाव-मावळ. अशी मदत केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!