Congress MLA Car Attack : नांदेडमध्ये उडाला गोंधळ! आमदार मोहन हंबर्डे यांच्या गाडीवर हल्ला, नेमकं काय झालं?


Congress MLA Car Attack : राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा जोरदार पेटला आहे. राज्य सरकारही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे. या अधिवेशनाआधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत.

अशातच नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे हे एका गावात कीर्तनाच्या कार्यक्रमाला गेले असतांना त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे.

गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराची कार फोडल्याची घटना घडली आहे. मराठा आंदोलकांनी ही कार फोडल्याची माहिती मिळत आहे. नांदेडमधील पिंपळगाव निमजीमध्ये ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ आहे.

दरम्यान, सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करा, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. याच मागणीसाठी बुधवारी मराठा आंदोलकांनी बीड बंदची हाक दिली होती. राज्यात मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मराठा आंदोलकांनी शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांची कार फोडली. Congress MLA Car Attack

नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजी या भागात ही घटना घडली आहे. आमदार मोहन हंबर्डे हे या भागात कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. याचवेळी मराठा आंदोलकांनी आमदार हंबर्डे यांची कार फोडली. या घटनेत आमदार मोहन हंबर्डे हे सुरक्षित आहेत.

नांदेड तालुक्यातील पुंड पिंपळगाव येथे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे हे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गावात गेले होते. गावात प्रवेश करताच मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत त्यांचा विरोध केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!