काँग्रेस हायकमांडाचा पक्षाच्या आमदाराला दणका ; ‘या’ कारणाने बजावली नोटीस

पुणे : दिल्लीतील काँग्रेस हायकमांडाने पक्षातील आपल्याच आमदाराला नोटीस पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात जन सुरक्षा विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर झालं. मात्र हे विधेयक सरकारनुसार दहशतवादी विचारांना खतपाणी घालणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यासाठी आणलं आहे. पोलिसांना डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि बंडखोरांविरुद्ध कारवाई करताना अडचण येते, म्हणून हा कायदा आणण्यात आला आहे. मात्र या विधेयकाला काँग्रेसने विधानसभा आणि विधान परिषदेत हवा तसा विरोध केला नाही. त्याची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल घेतली आहे.

काँग्रेस हायकमांडने जन सुरक्षा विधेयकाला प्रत्येक स्तरावर विरोध करा असे निर्देश दिले होते मात्र कोणताही विरोध केला नसल्याने पक्षातील आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी आमदारांना नोटीस पाठवून विचारणा केली आहे. आमदारांना या नोटिसीचे उत्तर देणं बंधनकारक आहे. तुम्ही जन सुरक्षा विधेयकाला विरोध का नाही केला? असा प्रश्न काँग्रेस हायकमांडने नोटिसद्वारे पक्षाच्या सर्व आमदारांना विचारला आहे. त्यामुळे हायकमांड काँग्रेस पक्षाच्या आमदारावर नाराज असल्याच्या चर्चांना उद्याण आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला अशी कोणतीही नोटीस आली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मला हायकमांडची कुठलीच नोटीस आली नाही. असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.
