Breaking News : कर्नाटकमध्ये काँग्रेसच ठरलं! अखेर मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब…


कर्नाटक : कर्नाटकचा विधानसभेचा निकाल ठरल्यानंतर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू होती. डीके शिवकुमार की सिद्धरामैया ही दोन नावे आघाडीवर होती. अखेर आता या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

आता सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती समोर आली आहे. तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

ते उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. तसेच डीके शिवकुमार यांना महत्त्वाच्या मंत्रालयांसह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. उद्या बंगळुरूमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांचीही भेट घेतली आहे. आता राहुल डीके शिवकुमार यांची भेट घेणार आहेत. यामुळे आता कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!