काँग्रेसला धक्क्यावर धक्के; ‘या ‘बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश

पुणे : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काँग्रेसचे सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या आता आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जळगावात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसचे सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पक्षप्रवेशाने भाजपची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठं खिंडार पडल आहे.