महिला सवलतीमध्ये एसटीचा घोळ, एकाच मार्गावर वेगवेगळे दर, महिलांमध्ये नाराजी..

नागपूर : सरकारने एसटीच्या बसमध्ये ‘महिला सन्मान योजना’ सुरू केली. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जात आहे. असे असताना एकाच मार्गावर जाण्या-येण्यासाठी वेगवेगळे भाडे आकारले जात आहे.

ही चूक अडचणीची ठरत असल्याने प्रवासी संघटना व महिला प्रवाशांमध्ये नाराजी आहे. प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे बोलले जात आहे.

या योजनेत गोंदिया ते बालाघाट व बालाघाट ते गोंदिया बसगाड्यांमध्ये नियमानुसार ४५ रुपये भाडे आकारण्यात येते. यामुळे या ठिकाणी महिला प्रवास करतात.
आई कुलस्वामिनी तुळजाभवानीला आतापर्यंतचे सर्वात मोठे दान! दानपेटीत आढळले एवढ्या कोटींचे हिरे
हे तिकीट दर योग्य आहे. मात्र, भंडारा विभागाच्या तिरोडा, गोंदिया, साकोली व तुमसर आगाराच्या बसेसमधून याच मार्गासाठी ५५ रुपये आणि ४५ रुपये भाडे आकारण्यात येत आहे. जाण्या-येण्यासाठी तिकीट दरात दहा रुपयांची ही तफावत आहे.
गौतमी पाटील आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रकरणी तरुणाला जामीन मंजूर
यामुळे अनेकदा वाद होत असतात. प्रवासी संघटनेने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संपर्क साधून हा घोळ दूर करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र, अद्याप त्यात सुधारणा झाली नाही. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.