लालपरीत मद्यपान करून कंडक्टर आला ड्युटीवर, प्रवाशांनी काढला व्हिडिओ, कारवाईची मागणी…


पालघर : अनेकदा मद्यपान करून अनेकजण गाडी चालवतात. यावर सरकार कारवाई पण करत असत. पण अजूनही या घटना कमी झाल्या नाहीत. असे असताना आता अजून धक्कादायक विडिओ समोर आला आहे. एसटी महामंडळाच्या बसमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ पालघरमधील एका एसटी महामंडळाच्या बसचा आहे. या बसमधील वाहक हा मद्यपान करून कर्तव्यावर असल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे कारवाईची मागणी केली असून याबाबत प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

मद्यपान केल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहकाला धड स्वतःचा तोलही सावरता येत नसल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. वाहकाच्या या अवस्थेवर बस चालक चांगलाच संतापला आहे. त्यांना देखील गाडी चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. विडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

धावत्या बसमधील या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ बसमधील प्रवाशांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केला आहे. यानंतर प्रवाशांनी हाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!