ज्येष्ठ नेते रामदास चौधरी यांना मातृशोक!

उरुळीकांचन : सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील श्रीमती. कौशल्या पंढरीनाथ चौधरी (वय -९७) यांचे मंगळवार( दि. ९) रोजी वृद्धपकाळाने निधन झाले आहे.
स्वातंत्र्योउत्तर काळात हवेली तालुक्याच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या महत्वाचा राजकीय नेत्यांत सहभाग असणारे दिवंगत नेते पंढरीनाथ बाबुराव चौधरी यांच्या त्या पत्नी होत्या. राजकीय कौटुंबिक वारसा सांभाळण्यासहीत उत्तम शेती व्यवसाय त्यांनी खंबीरपणे सांभाळला होता.
राष्ट्रवादी चे हवेली तालुक्याचे ज्येष्ठ नेते रामदास चौधरी यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पित्रुंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाच्या पश्चात हवेली तालुक्यातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Views:
[jp_post_view]