बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस बँकांना सुट्टी, पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर…

पुणे : २०२५ वर्षाचा शेवटचा महिना, डिसेंबर काही दिवसांत संपणार आहे. त्यानंतर नवीन वर्ष सुरू होईल. जानेवारी २०२६ मध्ये बँका १६ दिवस बंद राहतील. यामध्ये सार्वजनिक सुट्ट्या, रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक आर्थिक व्यवहार, वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे नियोजन करत असतात. मात्र, जानेवारी २०२६ मध्ये बँकांना तब्बल १६ दिवस सुट्टी असल्याने ग्राहकांनी आधीच नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने आपल्या अधिकृत वेबसाईटवर जानेवारी २०२६ मधील बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे या सर्व सुट्ट्या संपूर्ण देशात एकाच दिवशी लागू होणार नाहीत. राज्यनिहाय सण, उत्सव आणि स्थानिक कारणांनुसार बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

जानेवारी २०२६ मध्ये बँका या दिवशी बंद राहणार…
१ जानेवारी २०२६: नवीन वर्षाचा दिवस / गान-नगाई (आयझॉल, चेन्नई, गंगटोक, इंफाळ, इटानगर, कोहिमा, कोलकाता, शिलाँग)
२ जानेवारी२०२६: नवीन वर्षाचा उत्सव / मन्नम जयंती (आयझॉल, कोची, तिरुवनंतपुरम)
३ जानेवारी २०२६: हजरत अली यांचा जन्मदिन (कानपूर, लखनौ)
१२ जानेवारी २०२६ स्वामी विवेकानंद जयंती (कोलकाता)
१४ जानेवारी २०२६ : मकर संक्रांती / माघ बिहू (मुंबई, अहमदाबाद, भुवनेश्वर, गुवाहाटी, इटानगर)
१५ जानेवारी २०२६: उत्तरायण पुण्यकाळ / पोंगल / माघी संक्रांती (बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, हैदराबाद, विजयवाडा)
१६जानेवारी, २०२६: तिरुवल्लुवर दिवस (चेन्नई)
१७ जानेवारी २०२६: उझावर थिरुनल (चेन्नई)
२३जानेवारी २०२६: नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती / सरस्वती पूजा / बसंत पंचमी (अगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता)
२६ जानेवारी २०२६: प्रजासत्ताक दिन (मुंबईसह संपूर्ण देशात बँका बंद असणार)

साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बंद राहणाऱ्या तारखा..
४ जानेवारी – रविवार
१० जानेवारी – दुसरा शनिवार
११ जानेवारी – रविवार
१८ जानेवारी – रविवार
२४ जानेवारी – चौथा शनिवार
२५ जानेवारी – रविवार
