शिरुर-हवेलीतील रखडलेली कामे पूर्ण करा ; प्रदिप कंद यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना साकडे…!


उरुळी कांचन : शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी विकासकामांचा संकल्प केला होता. त्यासाठी त्यांनी वाघोली ते शिरुर दरम्यान उड्डानपूल ,वाहतुक कोंडी फोडण्यासाठी बायपास रस्ते तसेच शिरुर-हवेली तालुक्याला जोडणाऱ्या महत्वकांक्षी पाबळ , तळेगाव , उरुळी कांचन ,शिंंदवणे राज्य मार्गांची उर्वरीत प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून बाबुराव पाचर्णे यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करावे , अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

शिरुर-हवेलीतील शिष्टमंडळाने नुकतीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन, दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मतदारसंघात आणलेल्या कोट्यवधींच्या निधीसह अर्धवट असलेली विकासकामे पूर्ण करावी अशी मागणी केली आहे. शिरुर-हवेलीत भाजप शिष्टमंडळाने हायब्रीड ॲन्युईटी योजने अंतर्गत पाबळ – तळेगाव -शिक्रापूर -शिंदवणे या राज्यमार्गांला २८७ कोटी इतका निधी २०१७ मध्ये मंजूर केला आहे. तसेच लोणीकंद – थेऊर अष्टविनायक मार्ग अतिशय संथगतीने सुरू आहे. या मार्गांवर गेली अडीच वर्षात पाठपुरावा न झाल्याने काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्री तातडीने या मार्गाचे अर्धवट काम पूर्ण करावे अशी मागणी केली आहे. माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी वाघोली ते शिरुर हा सहापदरी मार्ग तसेच या मार्गांवर उड्डानपूल तसेच चाकण रस्ता , जातेगाव ते कासारी फाटा हा बायपास मार्ग तयार केले होते. ही कामे पूर्ण करण्यात यावी .त्याचबरोबर न्हावरा -चौफुला रस्तावरील उर्वरीत टप्पा मंजुर करावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, शिरुर भाजप तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिरुर बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, पीएमआरडीएचे सदस्य स्वप्नील उंद्रे, युवा नेते अजिंक्य कांचन, सुदर्शन चौधरी उपस्थित होते.

यापुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे- नगर रस्त्यावरील वाघोली ते शिक्रापूर रस्त्याचे सहापदरीकरण काम हायब्रीड ॲन्युईटी योजनेतून पूर्णत्वास जात आहे. सन २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यामध्ये प्रथमच हायब्रीड ॲन्युटीप्रकल्प सुरु करून त्यात वाघोली-शिक्रापूर-शिरूर हा संपूर्ण सहापदरी मार्ग प्रस्तावित करून ४६२ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यताही दिली होती. आता उर्वरीत कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बैठक घेणार आहेत असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सन २०१८ मध्ये वाघोली ते शिरूर हा संपूर्ण पुणे-नगर महामार्ग हायब्रीड अॅन्युटी योजनेत घेण्याचा निर्णय होताच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने शिक्रापूर- शिरूर रस्त्याचे काम रखडण्याची चिन्हे दिसू लागल्यावर तत्कालीन आमदार बाबूराव पाचर्णे यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याचाच इशारा तत्कालीन मुख्यमंत्री व पक्षश्रेष्ठींना दिला होता. याची आठवण मात्र या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी आवर्जून काढल्याचे राहुल गवारे यांनी सांगितले

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!