लोणी काळभोर वनपरिमंडळात बिबट्याने केलेल्या हल्यात मृत पक्षुमात्र पाळकांना नुकसान भरपाई! वनविभागाकडून शासन निकषात भरपाई वाटप…

लोणी काळभोर : वनपरीमंडळ लोणी काळभोर मधील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या पशुधन नुकसान भरपाईपाेटी पशुपालक लाभार्थी यांना शासन नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात आली. बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्या, गायी, कालवडी, वासरे आदी जनावरांचा मृत्यू झाला हाेता.
वन विभागाने पंचनामे करुन मदतीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला हाेता. यानुसार संबंधित पशुधनपालकांना मदत मंजूर झाली हाेती. लोणी काळभोर येथे प्रभु निवृत्ती रुपनवर (टिळेकरवाडी), मारुती लक्ष्मण ढवरे (वाडेबोल्हाई) रामदास शंकर श्रीराम (भुर्केगांव) लहु रामभाऊ बरकडे (तरडे) बबन नातु तोंडे (हिंगणगाव) व तुषार हरीचंद्र शिंदे (शिंदेवाडी) या पशुपालकांना एकुण १ लाख ८५ हजार मदतीचे धनादेश देण्यात आले.
शासनाकडून मदत मिळाल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, वनपरीमंडळ अधिकारी लोणी काळभोर प्रमोद सकर, वनरक्षक लोणी काळभोर अंकुश कचरे, संभाजी गायकवाड (खामगांवटेक), कोमल सपकाळ (अष्टापुर), पुजा कुबल (डोगरगांव), प्रती नागले (आळंदी म्हातोबाची), ऋतुजा कचरे (थेऊर रोपवाटिका), बापु बाजारे वनसेवक वनपरीमंडळ लोणी काळभोर. तुळशीराम कोंढारे वनसेवक लोणी काळभोर आदी उपस्थित हाेते.