गौतम अदानींनी विकली १,६०० कोटींची कंपनी, कारणही आलं समोर…
मुंबई : सध्या समूहाच्या दोन कंपन्या विकल्या गेल्या आहेत. विदेशी इक्विटी फर्म बेन कॅपिटलने अदानी समूहाच्या अदानी कॅपिटल आणि अदानी हाउसिंग या समूह कंपन्या विकत घेतल्या आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, कंपनीच्या विक्रीबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे. बेन कॅपिटलने अदानी कॅपिटल आणि अदानी हाउसिंगची ९०% भागीदारी विकत घेतली आहे. त्यानंतर आता या कंपनीचा केवळ १०% हिस्सा अदानी समूहाकडे शिल्लक आहे.
भागीदारी व्यवस्थापन, एमडी आणि सीईओ गौतम गुप्ता यांच्याकडे असेल. अमेरिकन फर्म अदानी समूहाच्या अदानी कॅपिटलमधील ९०% हिस्सा विकत घेऊन १२० दशलक्ष डॉलर गुंतवणूक करेल.
अदानी समूहाच्या अदानी कॅपिटलचे एकूण मूल्यांकन १६०० कोटी रुपये आहे. अमेरिकन फर्मसोबतचा करार पूर्ण झाल्यानंतर गौतम अदानी म्हणाले की, आपण या करारावर खूप खूश आहोत.
दरम्यान, हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून अदानींच्या व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.