चाकण येथे भरधाव हायवा ट्रकच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू…
पुणे : भरधाव वेगात जाणाऱ्या हायवा ट्रकची धडक बसून एका पोलीस हवालदाराचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.९) सकाळी दहाच्या सुमारास चाकण येथे घडली.
पोलीस नाईक योगेश गणपत ढवळे (वय. ४०) असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, चाणक वाहतूक विभागात कार्य़रत असणारे पोलीस नाईक योगेश ढवळे हे आज सकाळी दहाच्या सुमारास पंचप्रण शपथ घेण्यास जात होते.
चाकण-पुणे रोडवरील भारत पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीला (एमएच 14 सीएफ 6480) भरधाव वेगात आलेल्या हायवाची (एमएच 14 जेएल 9936) धडक बसली. यामध्ये ढवळे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
योगेश ढवळे हे मूळचे जुन्नर येथील असून सध्या ते चाकण येथे राहण्यास आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. ढवळे यांच्या मृत्यूची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Views:
[jp_post_view]