राज्यात थंडी ओसरली, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार, जाणून घ्या हवामान विभागाचा इशारा…

पुणे : नोव्हेंबरचा शेवट जवळ येत असल्याने सकाळ-संध्याकाळची थंडी आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. मात्र यंदा हवामानात अचानक बदल होताना दिसत असून तापमानात किरकोळ वाढ आणि काही भागांत ढगाळ हवामानाची नोंद होऊ शकते.

तसेच पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण होत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज असून, राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या काही दिवसांत कोकणातील अनेक शहरांत रात्रीच्या वेळी तापमानामध्ये घट झाली होती, परंतु आज मुंबईसह आसपासच्या भागांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

तसेच पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण होत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज असून, राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
काल म्हणजेच रविवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी १०.१ अंश तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान १४ अंशांच्या वर गेल्याने थंडी कमी झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला असून, उकाडा जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीपार असून, रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान झाले असून राज्यात आकाश ढगाळ होत आहे. आज राज्यात थंडी कमी होणार असून, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ आकाश, विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी होणार आहे.
