पुणे हादरले! कोचिंग क्लास, रक्तबंबाळ विद्यार्थी अन् मित्र…१०च्या मुलाने मित्राची केली हत्या, नक्की काय घडलं?


पुणे : पुण्यातील राजगुरुनगर येथे एका खासगी कोचिंग क्लासमध्ये, शिक्षक शिकवत असतानाच एका विद्यार्थ्याने आपल्याच मित्राचा गळा चिरून निर्घृण खून केला आहे.

जुन्या वादातून अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेले हे ‘गँगवॉर’ इतके भयंकर होते की, वर्गात सुरू झालेला हल्ला वर्गाबाहेर येऊन संपला आणि उपचारादरम्यान एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला. या हत्येमुळे राजगुरूनगर शहरात खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

राजगुरुनगर येथील संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये दुपारच्या सुमारास ही भयानक घटना घडली. या क्लासमध्ये इयत्ता दहावीचा क्लास सुरू असताना एका अल्पवयीन विद्यार्थ्याने अचानक आपल्या क्लासमेटवर चाकूने हल्ला केला.

यावेळी आरोपी विद्यार्थ्याने मृत विद्यार्थ्याच्या गळ्यावर आणि पोटात चाकूने अनेक वार केले. रक्तबंबाळ झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ला करणारा विद्यार्थी या घटनेनंतर दुचाकीवरून तात्काळ फरार झाला.

       

सध्या पोलिसांनी शाळा सुटल्यानंतरही परिसरात पेट्रोलिंग सुरू केले आहे. आरोपी आणि मृत विद्यार्थी दोघेही अल्पवयीन आहेत. या हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या भयानक घटनेमुळे राजगुरुनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खासगी कोचिंग क्लासच्या व्यवस्थापनावर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक पालकांनी शाळा सुटायच्या वेळी शाळेबाहेर मोठी गर्दी करत पाल्यांना स्वतः घरी घेऊन जात आहेत. या गंभीर प्रकारामुळे शैक्षणिक संस्थांतील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा व क्लासमध्ये कडक नियम लागू करण्याची आणि पोलिसांकडून त्वरित कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच, शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांमध्ये वारंवार होणाऱ्या हाणामारीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!