आजपासून पुण्यातील ‘या’ भागात CNG पंप राहणार बेमुदत बंद…!

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी CNG पंप चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला जाईल असं सांगितलं होतं, याच पार्श्वभूमीवर आजपासून CNG पंप चालकांच्या संपाला पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सुरुवात होत आहे.

टोरंट कंपनी आणि CNG Pump चालक यांच्यातील वादाचा फटका आता सामान्य ग्राहकांना बसणार आहे. आजपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील CNG Pump चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. याचा परिणाम सामान्य वाहतुकीवर होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील टोरंट गॅसच्या डीलर्संनी आजपासून टोरंट CNG ची अनिश्चित काळासाठी खरेदी आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण भागातील एकूण ४२ CNG Pump बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. याचा फटका वाहतुकीवर पडणार असल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

Views:
[jp_post_view]