CM Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज की जय!! भारत-पाकिस्तान बॉर्डरवर शिवरायांचा पुतळा उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा…
CM Eknath Shinde मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय. ‘माझी माती, माझा देश’ कलश यात्रेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. CM Eknath Shinde
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात, मायदेशी आणली जाणार आहेत, हे देशासाठी अभिमानास्पद असून काहीजण मात्र त्याबाबत शंका उपस्थित करतायत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतोय, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भिती वाटेल.असे देखील ते म्हणाले आहे.