पुण्यात अजून एक महानगरपालिका होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल.

पुणे : सध्या पुण्यात आणखी एका महापालिकेसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. हडपसर वाघोली ही महापालिका तयार करा, अशी मागणी राजकीय नेत्यांसह समाजातील काही घटकांनी केली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आता नगरविकास विभागाचं पुणे महापालिकेला पत्र मिळाले आहे. त्यावर पुणे मनपाचे विभाजन करण्यासंदर्भात महानगरपालिकेकडे अभिप्राय मागवला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


एका आठवड्यात अभिप्राय राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. यामुळे पुण्यात दोन महापालिका अस्तित्वात येणार का ? या प्रश्नाचे उत्तर काही दिवसांत मिळणार आहे. पुणे महापालिकेचे विभाजन करण्याचा प्रस्ताव असताना काही गावे वगळली आहे.
पुणे मनपात असणारी फुरसुंगी आणि उरुळी देवाची दोन गावं वगळली गेली आहे. मात्र या दोन गावांमध्ये महापालिकेची 200 कोटी रुपयांची मिळकत कराची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्याचा पुणे मनपास अधिकार राहिला नाही.
असे असताना मात्र नवीन नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर नियमानुसार थकबाकी वर्ग केली जाणार आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट केलेली फुरसुंगी आणि उरूरी दोन ही गावं वगळून स्वंतत्र नगरपरिषद अस्तित्वात येणार आहे.
