डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि वर्षा निवासस्थान येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्य सरकारने रेशनकार्ड धारकांना आनंद शिधा वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
Views:
[jp_post_view]