कार्यकर्त्यांने आदिवासी तरुणावर केली लघवी, आणि मुख्यमंत्र्यांनी थेट त्याला बोलावून धुतले पाय, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

भोपाळ : मध्यप्रदेशातील मुख्यमंत्र्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे पीडित आदिवासी तरुणाला बोलावून घेऊन त्याचे पाय धुताना दिसत आहेत आणि त्यांनी त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
भाजप नेते प्रवेश शुक्ला यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. नशेच्या अवस्थेत तो एका आदिवासी तरुणावर लघवी करत आहे. या घटनेचा संतापजनक व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
भाजपकडून घटनेचा निषेध
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी थेट या घटनेवर ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले- मी सिधी जिल्ह्यात घडलेल्या अमानुष घटनेचा तीव्र निषेध करतो. मध्यप्रदेशातील गुन्हेगारांना कोणत्याही किमतीत सोडले जाणार नाही.
या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर कारवाई आणि NSA लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दशमत रावत यास घरी बोलावले आणि त्याचे पाय धुवून त्यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि सांगितले की, हा व्हिडिओ मी अशासाठी शेअर करतो आहे की, सगळ्यांनी लक्षात घ्यावं.
मध्यप्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असला तरी जनता भगवान आहे. कोणावरही अत्याचार सहन केला जाणार नाही. राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान हाच माझा सन्मान आहे.
हे प्रकरण समोर येताच भाजपने शुक्ला यांच्याविरोधात कडक पावलं उचलली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपीवर एनएसए अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.