भुरट्यांना कसली मर्दुनकी ! रस्त्यावर कापड विक्रेत्यांना मारहाण करुन लुटले! सोरतापवाडीत घडलेल्या घटनेने नागरीकांत प्रंचड संताप..!!
उरुळी कांचन: मोलभाव (सैदेबाजी/भावतोल) करून कुटुंबाची उदरनिर्वाह करणाऱ्या कुटूंबाला भुरट्या चोरट्यांनी वाद घालून काठीने बेदम मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महालक्ष्मी रेस्टो बारच्या परिसरात सोमवारी (दि.२४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात ५ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकिल यासीन शेख (वय ४४) अमिर यासीन शेख व मावस भाऊ सर्फराज मोहम्मद हुसेन (रा. अशोका सुमित सोसायटी, दुसरा माळा, फलॅट नंबर ४०३, पुराणी कब्रस्तान कोंढवा पुणे) अशी मारहाण झालेल्या तिघा भावांची नावे आहेत. याप्रकरणी अकिल शेख याने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अकिल शेख व त्याचे भाऊ रस्त्यावर फिरून कापड व बंग विक्री करतात. हा व्यवसाय करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. नेहमीप्रमाणे तिघेही पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि.२४) कपडे व बंग विक्री करीत होते. दरम्यान, फिर्यादी व त्यांचे भाऊ सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महालक्ष्मी रेस्टी बारच्या परिसरात विक्की करीत असताना, तेथे पिवळया व पांढ-या रंगाच्या ऍक्टिवा गाडीवरून दोन अनोळखी इसम कपडे खरेदीसाठी आले. त्यांना टि शर्टची किंमत प्रत्येकी २०० रुपये असल्याचे सांगितले, त्यानंतर त्यानी ३ टी शर्ट पसंद केले.
त्यानंतर त्या दोन अनोळखी इसमानी मोलभाव करून ३०० रुपये घ्या. असे म्हणून ३ फेरीवाल्या भावासोबत वाद घालुन शिवीगाळ व दमदाटी करू लागले. त्यानंतर तेथे चारचाकी गाडीतून आणखी 3 अनोळखी इसम आले. त्या इसमांनी त्यांच्याकडील लाकडी दांडके, दोन स्टिलचे पाईप, हाताने व लाथाबुक्यांनी ३ फेरीवाले विक्रेत्या भावाना बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान, या आरोपीमधील आकाशी रंगाचा शर्ट, ग्रे रंगाची पेन्ट, निळ्या रंगाची पगडी, दाढी पूर्ण फुल व वय अंदाजे ४२ वर्षाच्या एका अनोळखी इसमाने त्याच्या हातातील स्टिलच्या पाईपाने सर्फराज मोहम्मद हुसेन याच्या डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत सर्फराज हुसेन गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपीने त्याच्या खिशातील ७ हजार काढून पळून गेला. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात ५ जणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस निरीक्षक शकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत.
दरम्यान घडलेल्या या प्रकाराने भुरट्या चोरट्यांचा हा प्रकार करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत काय , त्यांनी दिवसाढवळा लुटीचा प्रकार करुन बिहारी राजवटीसारखे दहशतीचे कृत्य केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरीकांनी या चोरट्यांचा पोलिसांनी शोध घ्यावी अशी मागणी केली आहे.