वर्गमित्राने दिला त्रास, प्रेमात नको त्या गोष्टी, पुण्यात 15 व्या मजल्यावरून उडाली मारलेल्या 20 वर्षीय इंजिनिअरिंगच्या तरुणीच्या आत्महत्येबाबत भयंकर माहिती समोर….

पुणे : इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. सहिती रेड्डी (वय-२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तपास सुरू होता.

तपास करत असताना वर्गमित्र मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने तरुणीने आत्महत्या केल्याचे आता तपासात उघड झाले आहे. सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रणव राजेंद्र डोंगरे (वय- २०, रा. आकुर्डी) याला अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, सहिती हिने ५ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास राहत्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सहिती हिचे मित्र- मैत्रिणी फिर्यादी कलुगोटाला रेड्डी यांना भेटण्यासाठी आले. सहिती हिने मृत्युपूर्वी तिच्या मोबाईल वरून मैत्रिणीला मोबाईलचा पासवर्ड आणि सोसायटीमधील मित्राचा नंबर शेअर केला असल्याचे मैत्रिणीने सहितीच्या कुटुंबियांना सांगितले.

नंतर कुटुंबीयांनी सहितीचा मोबाईल फोन अनलॉक केला. त्यामध्ये सहितीने मित्र प्रणव, आई-वडील आणि सर्वांसाठी असे तीन व्हॉइस रेकॉर्डिंग करून ठेवले होते. यामुळे सगळेच हादरले. पोलिसांनी याबाबत तपास केला.
दरम्यान, सहिती आणि तिचा वर्गमित्र प्रणव यांचे प्रेमसंबंध होते. सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन प्रणव हा तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या तो करत होता. या सगळ्या गोष्टींना ती कंटाळली होती. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले.
त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी प्रणव डोंगरे याला अटक केली. या घटनेने सगळेच हादरले असून पोलिसांनी काही काळातच याचा तपास लावला आहे. या घटनेने मुलीच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.
