माळेगावमध्ये काटे की टक्कर! सांगवी गटातून चंद्रराव तावरे आघाडीवर, निकालाची उत्सुकता वाढली…


बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीतील पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. बारामती येथील अभियांत्रिकी भवनमध्ये सध्या मतमोजणी सुरू आहे. या ठिकाणी ब वर्ग प्रतिनिधी मतदारसंघाची मोजणी झाल्यानंतर अजित पवार यांचा विजय झाला आहे. हा विजय अपेक्षितच होता.

असे असताना सुरुवातीच्या कलामध्ये विरोधी पक्षाचे चंद्रराव तावरे सांगवी गटातून आघाडीवर आहेत. यामुळे निकालाची उत्सुकता वाढली आहे. यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार नसून याठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून उभे होते.

दरम्यान, ब वर्गातून अजितदादांना ९१ इतकी मते मिळाली. तर भालचंद्र बापूराव देवकाते यांना १० मतांवर समाधान मानावे लागले. अपेक्षेनुसार अजितदादांनी ब वर्गातून विजय मिळवला आहे. आजच्या मतमोजणीत निळकंठेश्वर पॅनलची विजयी सुरुवात झाली असून पुढे काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सध्या प्रशासकीय इमारतीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. यामुळे याठिकाणी काही अपडेट आल्या की कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!