अजित पवारांशी पंगा घेतलेल्या IPS अंजना कृष्णासाठी नागरिक रस्त्यावर ;’ लाडक्या बहिणींचा अपमान कदापी….

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासनावर वचक ठेवणारे लोकप्रतिनिधी म्हणून ख्याती आहे. परंतु सोलापूरमधील IPS अंजना कृष्णा यांच्याशी बोलताना त्यांनीं दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला. यानंतर आता अंजना कृष्णा यांच्या समर्थनात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.’ लाडक्या बहिणींचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही ‘अशा घोषणा देत नागरिकांनी अजित पवारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खनना विरोधात कारवाईसाठी गेलेल्या करमाळा विभागाच्या आयपीएस अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषण व व्हिडिओ कॉल प्रकरण सोशल मीडियावर चांगले चर्चेत आले आहे. या व्हिडिओत त्यांनी कृष्णा यांना दमदाटी केल्यानंतर त्यांच्या समर्थनात शेतकरी हळूहळू रस्त्यावर उतरू लागले. शेतकरी नेते अतुल खुपसे यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे मात्र त्यापूर्वीच सोलापूर पोलिसांनी 15 ते 20 जनावर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र आता ‘महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे, इथे स्त्रीला इज्जत दिली जाते अशा आशयाचा मजकूर करमाळा येथील शेतकऱ्यांनी बॅनर लिहिला आहे. त्यांनी अजित पवारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे.
दरम्यान याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधकांकडून हा प्रचार करण्यात असून शेतकऱ्यांशी म्हणणं ऐकून त्यांच्यावर कारवाई करा असे पवारांचे सांगणे होते.परंतु ते दम असल्याचा खोटा प्रचार करणे गैर असल्याच स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान वायरल झालेल्या व्हिडिओत कृष्णा यांनी पवार यांचा आवाज ओळखला नसल्याने पवार स्वतःची ओळख देऊन तुमची इतकी हिंमत की मला ओळखले असे बोलत असल्यास ऐकू येत आहे. त्यावर पवार संतापले असून मी तुमच्यावर कारवाई करीन असा इशारा देखील दिला दरम्यान कृष्णा यांचा मोबाईल नंबर घेतल्यानंतर पवार यांनी थेट व्हिडिओ कॉल करून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे..
