चर्चगेट स्थानकाचे नाव बदलून होणार चिंतामणराव देशमुख स्टेशन..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठराव मंजूर...


मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चगेट स्थानकाचे नामकरण चिंतामणराव देशमुख स्टेशन असे करण्याचा ठराव मंजूर केला. चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे 1943 मध्ये आरबीआयचे पहिले गव्हर्नर बनले होते. 1950-56 दरम्यान ते भारताचे अर्थमंत्रीही झाले. त्यांच्या नावावरून चर्चगेट स्थानकाला नाव देण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर (ता.21) रोजी पहिल्यांदाच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली.

तत्पूर्वी ,मुंबईमध्ये हॉटेल प्रेसिडेंटमध्ये झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी एकनाथ शिंदे होते. बैठक संपल्यानंतर कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी त्यातील प्रस्ताव आणि मागण्यांशी संबंधित माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबईतील चर्चगेट स्थानकाला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!