‘छोटा पुढारी’ घनश्याम दराडे यांच्या वाहनाचा अपघात; सोरतापवाडी हद्दीत घडला अपघात …!
उरुळी कांचन : महाराष्ट्रात ‘छोटा पुढारी’ अशी ओळख असलेल्या घनश्याम दराडे यांच्या चारचाकी वाहनाचा आज सकाळी नऊ वाजनेच्या सुमारास पुणे – सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत अपघात झाला.
दराडे यांच्या अपघातग्रस्त वाहनात, दराडे यांचे आई – वडील, व आणखी दोघेजण असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दराडे यांच्या आईला किरकोळ जखम झाली असुन, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
घनश्याम दराडे यांचे आई – वडील, व आणखी दोघेजण पुणे – सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचनहुन पुण्याच्या बाजूने निघाले होते. याचवेळी सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील फाट्यावर अचानक एक वाळूच्या डंपरने दराडे यांच्या चारचाकीला चालकाच्या उजव्या बाजूने ठोसर दिली.
या अपघातात चारचाकी गाडीचे नुकसान झाले असून अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळतात दराडे स्वतः घटनास्थळी पोचले होते. लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी पोचले असुन अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
पालखी सोहळ्यासाठी ररस्ते बंद असतांनाही, डंपर रस्त्यावर ?
जगातगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी आज बुधवारी लोणी काळभोर मुक्कामी असल्याने शेकडो पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरच्या बाजूने येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.
तरीही हा डंपर महामार्गावर कसा आला व अपघात कसा झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे प्रशासनाचे लक्ष आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.