Chitra Wagh : पॉर्न फिल्मवरुन चित्रा वाघ अन् सुषमा अंधारेंची जुंपली!! मी काय बघते, काय बघत नाही, यापेक्षा…
Chitra Wagh : राज्यात लोकसभा निवडणुकच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. राज्याच्या राजकारणात एक नवा वाद समोर आला आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.
शिवसेना उबाठा पक्षाकडून महिला अत्याचारासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये पॉर्न फिल्ममधील कलाकार घेतल्यावरुन भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. Chitra Wagh
आता शिवसेना ठाकरे गट आणि भाजपाच्या महिला नेत्यांमध्ये या प्रकरणावरुन चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, असे म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सु सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्या आरोपवर प्रत्युत्तर दिलं होतं. सुषमा अंधारेंच्या या विधानावर आता चित्रा वाघ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, मी काय बघते, काय बघत नाही, यापेक्षा मी विचारलेला प्रश्न खरा आहे की खोटा ते सांगा, असं चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच उबाठ्याच्या दिवट्यांवर बोलल्यानंतर अंधारातील सटरफटर चिलटं फडफडतात.
मला काहीही बोला, पण तो ऍक्टर पॉर्न स्टार आहे की नाही ते सांगा, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ज्यांच्या मांडीवर बसले त्यांचे सरकार कर्नाटकात आहे, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली आहे.